योगासनाप्रमाणेच वृक्षारोपनाचे कार्य करावे – सुरेंद्रसिंग पाटील

जळगाव : योगासनाप्रमाणेच वृक्षारोपन व त्या वृक्षांचे संगोपन केल्यास निसर्गाचे अर्थात पर्यावरणाची मोठी मदत होईल असे प्रतिपादन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्रसिंग पाटील यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन आणि मराठी जेष्ठ महिन्यातील वटसावित्री पौर्णिमा या दोन्ही बाबी एकाच दिवशी आल्या आहेत. त्यानिमित्ताने सुरेंद्रसिंग पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

आपले शरीर निरोगी राहण्यासाठी आपण योगासन करत असतो तसेच आपल्या पतीच्या दिर्घायुषासाठी महिला वटसावित्री पौर्णिमा साजरी करत  असतात. वटसावित्री पौर्णीमेच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. ब्रह्मा, विष्णू व महेश या तिन्ही देवतांना या दिवशी महिला पतीच्या दिर्घायुष्यासाठी विनंती करतात.

वडाचे झाड हे मोठ्या प्रमाणात प्राणवायू देणारे झाड आहे. वातावरण निर्मितीसाठी हे एक बहुगुणी झाड आहे. काही ठिकाणी अनेक पिढ्या होऊन गेल्या तरीही हे झाड आपले अस्तित्व टिकवून आहे. काही कारणास्तव वडाची झाडे कमी झाली असली तरी   आपल्या माता भगिनींच्या सोयीसाठी आपण रहात असलेल्या मोकळ्या जागेत अथवा सोयीच्या जागी हे झाडाचे संगोपन केल्यास वातावरणात बदल होऊन ऑक्सीजन युक्त शुद्ध हवा मिळू शकेल. तसेच आपली भारतीय संस्कृती देखील अबाधित राहील.

आपले शरीर निरोगी राहावे यासाठी आपण योगासन आपल्या घरी अथवा गच्चीवर किंवा फिरायला जाऊन एकत्रित नित्यनेमाने करत असतो. तसेच काही जण सकाळ – संध्याकाळ शुद्ध हवेसाठी फिरण्यास जातात. कुणी धावण्यास जातात तर कुणी सायकल चालवण्यास जातात. त्यासाठी अनेकांनी रनिंग गृप, सायकलिंग गृप, गुड मॉर्निंग गृप असे विविध गृप तयार केले आहेत. आपणास शुद्ध हवेची नितांत आवश्यकता असते. त्यासाठी ऑक्सीजनयुक्त दीर्घकाळ टिकणारी वाल पिंपळ, निंबा चिंच अशी अनेक प्रकारची झाडे आहेत.

आंबा, चिकू अशी अनेक प्रकारची झाडे लावल्यास शुद्ध हवा मिळण्यासह पर्यावरणास हातभार लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “एक पेड मा के नाम” लावण्यासाठी असे आवाहन केले आहे. प्रत्येकाने वृक्ष लावतानां पाण्याच्या बाटलीसह एक फोटो तसेच आम्ही एक झाड “मा के नाम” लावणार व ते जगवणारच असे घोषवाक्य असलेला एक फोटो आपल्या डीपीवर ठेवल्यास त्यातून इतरांना प्रेरणा मिळेल व वृक्ष संगोपन होण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here