कपडे बदलतांना केले विवाहितेचे फोटो सेशन — चुलत भावासह मित्रांनी केले अत्याचाराचे सेशन

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): माहेरी आलेल्या चुलत बहिणीचे कपडे बदलतांना लपून काढलेल्या फोटोच्या आधारे तिला ब्लॅकमेल करण्यासह अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी विवाहीतेने एमआयडीसी पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात पिडीत विवाहीतेच्या चुलत भावाचा देखील समावेश आहे. भावासह त्याच्या मित्रांनी चुलत बहिणीवर गेल्या दोन वर्षापासून वेळोवेळी अत्याचाराचा निंदनीय प्रकार केला आहे.

जळगाव शहरातील एक विवाहिता 4 डिसेंबर 2022 रोजी तिच्या माहेरी दोंडाईचा येथे काकाच्या मुलीच्या लग्नाला गेली होती. काकांच्या घरी कपडे बदलतांना तिच्या चुलत भावाने तिचे चोरुन लपून फोटोसेशन तसेच व्हिडीओ तयार केला. काही दिवसांनी माहेरी मुक्कामी असतांना विवाहितेच्या त्या चुलत भावाने तिला ते फोटो व व्हिडीओ दाखवले.   हे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ डीलीट करण्यास तिने त्याला सांगितले. मात्र त्याने तिला नंतर डीलीट करतो असे म्हणत वेळ मारुन नेली. तिने देखील त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि कुणाला या प्रकाराबाबत काही सांगितले नाही.

त्यानंतर काही दिवसांनी विवाहीता आपल्या माहेरी जळगावला परत आली. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या त्या भावाने तिला फोन करुन तिला भेटण्यासाठी जळगावला येत असल्याचे सांगितले. ती विवाहीता घरी एकटीच असतांना त्याने तिला पुन्हा ते फोटो आणि व्हिडीओ तिला दाखवले. ते फोटो अजून डीलीट का केले नाही असे तिने त्याला विचारले.  या फोटोसह व्हिडीओच्या बळावर त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिची इच्छा नसतांना त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर पुन्हा 8 मार्च 2023 रोजी तो जळगाव येथे क्रिकेट टुर्नामेंटच्या निमित्ताने जळगावला आला. यावेळी त्याने तिला एका दवाखान्याच्या निर्जन गल्लीत बोलावून त्याठिकाणी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा 11 मार्च 2023 रोजी तो जळगावला आला. यावेळी त्याने तिला भरदुपारी फोन करुन त्याच ठिकाणी बोलावले. बाजारात जावून येते असा बहाणा करत ती त्याला भेटण्यासाठी गेली. यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत त्याचा नंदुरबारचा एक मित्र कार घेऊन आला  होता.

यावेळी दोघांनी तिला कारमधे बसवून पाळधी नजीक एका  जंगल परिसरात नेले. यावेळी पुन्हा त्या फोटोसह व्हिडीओच्या बळावर ब्लॅकमेल करत तिच्यावर दोघांनी एकाचवेळी अत्याचार केले.

त्यानंतर दि. 23 एप्रिल 2024 रोजी ती पिडीत विवाहीता मुलांना शाळेच्या सुट्या असल्यामुळे माहेरी गेली. यावेळी त्याने पुन्हा तिला त्याच स्वरुपाच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. दुस-याच  दिवशी 24 एप्रिल 2024 रोजी तिच्या चुलत भावाने अजून एका  मित्राला सोबत आणले. एका  निर्जन स्थळी तिला बोलावून दोघांनी तिच्यावर अत्याचार केले.

त्यानंतर दि. 5 जून 2024 रोजी त्या पिडीत विवाहितेच्या वडीलांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमानिमित्त ती माहेरी गेली होती. या संधीचा फायदा घेत तिच्या चुलत भावाने त्याच्या मित्राला तिला घेण्यासाठी पाठवले. त्याच्या मित्राने तिला मोटार सायकलवर बसवून एका  शेतात नेले. त्याठिकाणी दोघांनी तिच्यावर एका  पत्र्याच्या खोलीत अत्याचार केला.

अखेर या प्रकाराला कंटाळून पिडीत विवाहीतेने तिच्या सासरी सर्वांना हा प्रकार कथन  केला. सर्वांनी तिला एमआयडीसी पोलिस स्टेशनला या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सांगितले. अखेर तिने या प्रकरणी तिघांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरु आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here