जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशन मधील ठाणे अंमलदार कक्षाचे नुतनीकरण झाले आहे. या नुतनीकरणाचा उद्घाटन सोहळा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली 24 जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास संपन्न झाला. यावेळी विविध उद्योजक मान्यवर तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ठाणे अंमलदार कक्षाच्या नूतनीकरणाअंतर्गत फर्निचर, रंगरंगोटी, इलेक्ट्रीक आदी कामे करण्यात आली आहेत. पावसाळयात गच्चीवरुन पडणारे पावसाचे पाणी पिव्हीसी पाईपद्वारे शोषखडयात सोडण्याचे (रेन वॉटर हार्वेस्टींग) तसेच वृक्षरोपण देखील यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड तसेच दुय्यम अधिकारी व अंमलदार हजर होते. या नूतनीकरण कामासाठी मोलाची मदत करणारे जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अधिकारी चंद्रकांत नाईक, घनश्याम पाटील, संजय ठाकरे, स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल्सचे संचालक दिपक चौधरी, सुप्रीम इंड्रस्ट्रिज लिमीटेडचे जनरल मॅनेजर रविकिरण कोंबडे, धनंजय जहुरकर, हॉटेल प्रेसिडेंटचे संचालक मनोज अडवाणी, तुलसी एक्सटूजन्स लिमीटेडचे जनरल मॅनेजर संदीकादत्त मिश्रा, एच. आर. हेड पद्मनाभन अय्यंगर, व्यास इंड्रस्ट्रीजचे संचालक संजय व्यास, आदीत्य लॉनचे संचालक सुनिल मंत्री, हॉटेल फोर सिझनचे संचालक महेश परपियानी, पुष्पा पल्सेसचे संचालक राजेश अग्रवाल, किरण मशीन टुलचे संचालक चेतन चौधरी, अग्रवाल स्टिलचे संचालक मनिष अग्रवाल, माजी नगरसेवक मनोज आहुजा आदी हजर होते. या सर्वांचे सहकार्य या कामी लाभले आहे. या नूतनीकरणाचे काम आर्किटेक्ट मनोज पिट्रोदा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी काम केलेल्या सर्व कामगारांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.