मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसच्या नामांतराची सुवर्णकार समाजाची मागणी

नाशिक – मुंबईतील ब्रिटिशकालीन सात रेल्वे स्थानकांच्या इंग्रजी नावांचे मराठी नामांतर करण्याची प्रलंबित मागणी मंजूर झाली आहे. असे असले, तरी  ऑल इंडिया सोनार फेडरेशनने केलेल्या श्री संत शिरोमणी नरहरी आर्थिक विकास महामंडळ तसेच मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट रेल्वे टर्मिनस असे नाव देण्याच्या मागणीबाबत केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन अजूनही उदासीनता दाखवत आहे.

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ आणि मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसचे नामविस्तार या मागण्या मंजूर झाल्याचा निर्णय महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने ३० जून २०२४ पूर्वी जाहीर करावा, अशी मागणी ऑल इंडिया सोनार फेडरेशन, सकल भारतीय सोनार समाज संघटन, नाना जगन्नाथ शंकरशेट प्रतिष्ठान, मुंबई, ओबीसी सुवर्णकार समिती महाराष्ट्र राज्य आणि सेतुबंधन मधील विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांनी केली आहे.

सोनार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या श्री संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ बाबतची मागणी तसेच भारतीय रेल्वेचे शिल्पकार नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट सोनार यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला देण्यात यावे, या दोन्ही मागण्या ३० जून २०२४ पर्यंत मंजूर करून त्यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात यावा, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे.

वरील दोन्ही मागण्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करून त्यासंदर्भात अध्यादेश ३० जून २०२४ पूर्वी जारी न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमधील घटक पक्षांच्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा देण्यात येईल, अशी चर्चा संपूर्ण भारतात विखुरलेल्या सोनार समाजात होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here