घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद

On: June 29, 2024 5:44 PM

जळगाव : घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. किरण तुकाराम बारेला असे अटकेतील अट्टल गुन्हेगाराचे नाव असून अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. किरण बारेला याने पाच महिन्यापूर्वी अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे केलेला घरफोडीचा गुन्हा कबुल केला आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील स.पो.नि. विशाल पाटील, पोहेकॉ कमलाकर बागुल, पोहेकॉ संदिप पाटील, पोहेकॉ प्रविण मांडोळे, पोकॉ ईश्वर पाटील, चालक पोकॉ मोतीलाल चौधरी आदींनी या तपास कामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment