जळगाव/जळगाव, २८ जून (प्रतिनिधी):- ‘जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी उन्नत, शाश्वत शेती करून ते दुप्पट उत्पादन घेऊ लागले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम बनत आहेत.’ या सोबतच शाश्वत विकास, आधुनिक शेती, युवकांसाठी कृषी व कृषी उद्योगातील संधी, गांधीवाद याबाबतचा सुसंवाद जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी साधला. मुंबईच्या छात्र संसद आयोजित इंटरनेशन लीडरशीप टूर या उपक्रमांतर्गत इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट, नॅशनल लॉ युनिर्व्हसिटी, पारुल विद्यापीठाचे सुमारे ३७ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी जैन फार्म फ्रेश फुडस् चे संचालक अथांग जैन, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, छात्र संसदचे अध्यक्ष कुणार शर्मा, आदित्य वेगडा हे देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम जैन इरिगेशनच्या मुंबई कार्यालयात झाला.
इंटरनेशन लिडरशीप टूर २०२४ मध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, उपाध्यक्ष अनिल जैन यांनी रोल मॉडेल म्हणून उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधावा अशी विनंती छात्र संसदेचे अध्यक्ष अॅड कुणाल शर्मा यांनी केली होती. त्यानुसार “भारतातील कृषी उत्पादकता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण सिंचन उपाय” या विषयावर अनिल जैन यांनी उपस्थितांसमवेत सविस्तर चर्चा केली. संपूर्ण भारतात ७ दिवसांचा टूर असून सहभागी प्रतिनिधी २४ ते २६ जून तीन दिवस मुंबईत आणि दिल्लीमध्ये २७ ते २९ जूनपर्यंत ठरवून दिलेल्या रोल मॉडेल कंपन्यांना भेटतील असा हा उपक्रम आहे. यावर्षी हे विद्यार्थी अनिल जैन यांच्यासह राज्यपाल मा. रमेश बैस, उद्धव ठाकरे, राजदीप सरदेसाई, किरण बेदी, संजय सिंग, आदित्य ठाकरे आदी मान्यवरांच्या भेटी घेऊन चर्चा केली.
इंटरनेशन हा आजच्या तरुणांसाठी एक इमर्सिव हँड्स-ऑन लर्निंग प्रोग्राम आहे. ज्यांना सर्वच दृष्टीने सक्षम व्हायचे आहे आणि आपल्या सभोवतालच्या परिस्थितीत बदल घडवून भक्कम पाया करण्याची इच्छा आहे अशा युवाशक्तीसाठी खास कार्यक्रम आखला आहे. इंटरनेशनच्या माध्यमातून, छात्र संसद प्रतिनिधींना सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील तसेच सरकारमधील दूरदर्शी व्यक्तींना भेटण्याची आणि संवाद साधण्याची संधी प्रदान करते जेणेकरुन ते सर्वोत्तम गोष्टींकडून शिकू शकतील. यामध्ये शासनाच्या विविध मॉडेल्सना प्रत्यक्ष अनुभव देखील यात मिळणार आहे. जे महत्त्वाचे काम करतात परंतु ते दृष्टीक्षेपात येत नाही अशा व्यक्तींशी ही संवाद साधण्याची संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे.
या पूर्वीच्या कार्यक्रमात हे विद्यार्थी नितीन गडकरी, रंजन गोगोई, आतिशी मार्लेना, स्वाती मालीवाल, आनंद नरसिम्हन, राजदीप सरदेसाई, भूपिंदर हुडा, दीपिंदर हुडा, चरणजीत सिंग चन्नी, बी के शिवानी, टेमजेंग अलॉन्ग आणि चारू प्रज्ञा यासारख्या उल्लेखनीय व्यक्तींना भेटले आहेत. डॉ. सी.एन. अश्वथ नारायण, पियुष मिश्रा, नीरजा बिर्ला, आशिष चौहान, भगतसिंग कोश्यारी, किरीट सोमय्या, वरुण ग्रोव्हर, जॅकी भगनानी, चारू प्रज्ञा, सॅवियो रॉग्रिग्ज, किरण बेदी, ऐश्वर्या महादेव, सुब्रमण्यम स्वामी, पियुष गोयल, स्मृती इराणी, नरेंद्र तोमर, परशोत्तम रुपाला, आनंदीबेन पटेल, अखिलेश यादव, कपिल सिब्बल, विनय सहस्रबुद्धे, उदय माहूरकर आणि स्वाती मालीवालयासह प्रभावशाली व्यक्तींना भेटलेले आहेत.