नवी दिल्ली : प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकाधिक रेल्वे गाड्या सुरु करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. या रेल्वे गाड्या जिथून सुटतील व जेथे पोहोचतील त्या राज्यांच्या सरकारांकडे रेल्वेकडून संपर्क साधण्याचे काम सुरु आहे. या राज्यांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर या अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याची औपचारिक घोषणा करण्यात येईल. नेमक्या किती विशेष रेल्वे सोडल्या जातील याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. किमान १०० विशेष गाड्या सोडल्या जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या देशभरात २३० विशेष गाड्या धावत आहेत. औद्योगिक पट्ट्यातील कामगारांची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक गाड्यांची तिकिटे प्रतिक्षा यादीवर आहेत. सद्यस्थितीत सप्टेंबर महिन्यासाठी असलेली रेल्वेची सर्व तिकिटे बुक आहेत. बिहार, बंगाल, ओडीसा, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेश येथून महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली वअन्न औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांची सप्टेंबर महिन्याची स्लीपर व एसी-३ ची तिकीटे बुक झाली आहेत.
रु आहे.