जळगाव : गुरे चोरणा-या आंतरराज्य टोळीस निंभोरा पोलिसांच्या पथकाने अटक केली असून 11 म्हशींसह एकुण 16 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. निंभोरा पोलिस स्टेशनला गुरे चोरीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल होते. या दोन्ही गुन्ह्याच्या तपासाअंती अटकेतील टोळीकडून एकुण दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. 24 एप्रिल 2024 व 10 जून 2024 रोजी दाखल दोन्ही गुन्ह्यात एकुण पाच म्हशींची चोरी झाली होती.
निंभोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. हरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. ज्ञानेश्वर चौधरी, पो.ना.अविनाश पाटील या गुन्ह्याचा तपास करत होते. तपासादरम्यान साठ पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमे-यांची तपासणी करण्यात आली होती. तपासादरम्यान गुरे चोरणारे आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींपैकी तुकाराम रुमालसिंह बारेला (रा. बोरी जि. ब-हाणपूर) हा यावल तालुक्यातील फैजपुर, न्हावी परिसरात असल्याची पोलिस पथकाची खात्री झाली. फैजपूर पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी करण्यात आली.
आरोपी तुकाराम बारेला याची सखोल चौकशी केली असता गुरे चोरीतील इतर आरोपी मध्य प्रदेशात असल्याची माहिती समोर आली. त्या माहितीच्या आधारे स.पो.नि. हरिदास बोचरे यांच्या पथकातील पोहेकॉ. जाकीर पिंजारी, चालक हेकॉ. योगेश चौधरी, पो.ना. सुरेश पवार व पो.कॉ. मयुर निकम व रावेर पो. स्टे. चे पो.हे.कॉ. ईश्वर चव्हाण, पो.कॉ. सचिन घुगे आदींचे शोध पथक मध्यप्रदेशात गेले.
येथून धर्मेंद्र दुरसिंग बारेला (रा. ढेरीया जि. खंडवा) आणि शांताराम बिल्लरसिंह बारेला (रा. हिवरा जि. ब-हाणपूर), सुभाष प्रताप निंगवाल (रा. दहिनाला जि. ब-हाणपूर), मस्तरीराम काशीराम बारेला (रा. न्हावी ता.यावल) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून वून त्यांच्याकडुन 11 म्हशी व गुन्ह्यात वापरलेल्या दोन बोलेरो पिकअप व दोन मोटार सायकल असा एकुण सोळा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांनी आपला गुन्हा कबुल करत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विविध पोलिस स्टेशनला दाखल दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यात निंभोरा पोलिस स्टेशनसह फैजपुर, सुरत, मुक्ताईनगर, रावेर, सिल्लोड ग्रामीण जि. छत्रपती संभाजीनगर व पंधाना पो.स्टे. (जि, खंडवा मध्यप्रदेश) आदींचा समावेश आहे.
अटकेतील आरोपी धर्मेंद्र दुरसिंग बारेला याच्याविरुद्ध विविध कलमाखाली मध्य प्रदेशातील पोलिस स्टेशनला दाखल असून तो खंडवा जिल्ह्यातील पंधाना पोलिस स्टेशनच्या अभिलेख्यावरील हिस्ट्रीसिटर आहे. त्याला मध्यप्रदेश राज्यातील ब-हाणपूर, खंडवा, खरगोन व हरदा या जिल्हातून तडीपार करण्यात आले आहे.
निभोरा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हरिदास बोचरे यांच्यासह श्रेणी पोलिस उप निरीक्षक राजेंद्र पाटील, सहायक फौजदार ज्ञानेश्वर पाटील, चालक सहायक फौजदार अशरफ शेख, पो.कॉ. स्वप्निल पाटील, पोना सुरेश अढायगे, पोना सुरेश पवार, पोकॉ. मयुर निकम, पो.कॉ. किरण जाधव, पो.कॉ. अमोल वाघ, फैजपूर पोलिस स्टेशन प्रभारी अधिका-यांसह सहायक फौजदार विजय चौधरी, स.फौ. देविदास सुरदास, पोहेकॉ. राजेश ब-हाटे, पोहेकॉ महेद्र महाजन, रावेर पो स्टे चे पोहेकॉ. ईश्वर चव्हाण, पो.कॉ. सचिन घुगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना. ईश्वर पाटील, पो.कॉ. मिलींद जाधव, पो.कॉ. गौरव पाटील आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.