नालासोपा-यात मध्यरात्री कोसळली चार मजली इमारत

On: September 2, 2020 9:25 AM

नालासोपारा : नालासोपारा पुर्व भागातील संकेश्वर नगर परिसरातील “साफल्य” नावाची चार मजली इमारत मध्यरात्री अचानक कोसळली. सदर इमारत ही दहा वर्ष जुनी होती. या इमारतीचा काही भाग कोसळत असल्याची जाणीव येथील रहिवाशांना झाली. त्यामुळे इमारतीमधील रहिवासी तात्काळ इमारत सोडून बाहेर आले. त्यानंतर काही क्षणात ही इमारत कोसळली. या घटनेत वित्तहाणी मोठ्या प्रमाणात झाली असली तरी जीवीतहाणी टळली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मलबा हटवण्याचे काम सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment