गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघा तरुणांना अटक

जळगाव : रात्रगस्तीदरम्यान संशयास्पदरित्या आढळून आलेल्या दोघा मोटार सायकलस्वार तरुणांच्या झडतीत दोन पिस्टल, चार जीवंत काडतूस व दोन मॅगझीन आढळून आले आहेत. आज भल्या पहाटे दिड वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहर  पोलिसांच्या गस्ती पथकाच्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आला आहे.

भाग्यवान उर्फ माया लक्ष्मण गायकवाड (रा. चिकुंदरा ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद) व विकास संपत म्हस्के (रा. बालाजी नगर, आशा टेलर समोर, भोसरी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. आज 3 जुलै 2024 रोजी पहाटे दिड  वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहर  पोलिस स्टेशनचे पो.नि. संदीप पाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक योगेश माळी, स.फौ. विश्वास पाटील, स.फौ. शशिकांत महाजन, चालक पोहेकॉ नितीन वाल्हे, पोहेकॉ विनोद भोई, पोकॉ चत्तरसिंग महेर, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ रमेश पाटील, पोकॉ समाधान पाटील आदींचे पथक रात्रगस्त करत होते.

दरम्यान दोन संशयीत काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत संशयास्पदरित्या फिरत असल्याची गुप्त माहिती पोहेकॉ नितीन वाल्हे व विनोद भोई  यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांचा रात्रीच शोध घेण्यात आला.   चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन परिसरातच भाग्यवान उर्फ माया लक्ष्मण गायकवाड आणि विकास संपत म्हस्के या दोघांना संशयास्पदरित्या मोटार सायकलवर फिरतांना ताब्यात घेण्यात आले.

दोघांच्या अंगझडतीदरम्यान त्यांच्या कब्जातील गावठी बनावटीच्या दोन पिस्टल, चार जिवंत काडतुस, दोन मॅगझिन व ते वापरत असलेली पल्सर मोटारसायकल असा एकुण 1 लाख 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोघांविरुध्द चाळीसगांव शहर पोलिस स्टेशनला गुरनं. 289/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 29 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक योगेश माळी, पोहेकॉ विनोद भोई व पोकॉ कल्पेश पगारे करत आहेत. अटकेतील आरोपी भाग्यवान लक्ष्मण गायकवाड उर्फ माया हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध तुळजापूर पोलिस स्टेशनला हत्यार कायद्याप्रमाणे, नळदुर्ग पोलिस स्टेशनला प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तसेच लोणी काळभोर पुणे पोलिस स्टेशनला भा.द.वि. 363 नुसार असे एकुण तिन गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here