चोरीच्या तिन मोटार सायकलींसह चोरट्यास अटक

On: July 4, 2024 8:57 PM

जळगाव : चोरीच्या तिन मोटारसायकलींसह चोरट्यास रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. जगराम यारसींह बारेला असे अटक करण्यात आलेल्या चोरट्या तरुणाचे नाव आहे. त्याला रावेर येथील छोरीया मार्केट परिसरातून ताब्यात घेत चौकशीअंती अटक करण्यात आली.

रावेर येथील केळी व्यापा-याची मोटार सायकल 2 जुलै रोजी चोरीला गेली होती. त्याबाबत रावेर पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुशंगाने मिळालेल्या माहितीच्या आधारे जगराम यारसिंह बारेला यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती त्याने चोरीचा गुन्हा कबुल करत इतर दोन गुन्ह्यांची देखील कबुली दिली.

त्याच्या कब्जातून चोरीच्या एकुण तिन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोना किशोर सपकाळे, पोकॉ समाधान ठाकुर, पोकॉ सचिन घुगे, पोकॉ विशाल पाटील, पोकॉ प्रमोद पाटील, पोकॉ महेश मोगरे आदींच्या पथकाने या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment