साकेगाव नजीक रेल्वेच्या धडकेत मायलेकी ठार

On: September 2, 2020 11:06 AM

जळगाव : साकेगाव येथील रहिवासी हरिष शिरीष चौधरी(37) या तरुणाने आपली पत्नी व अडीच वर्षाच्या मुलीसह धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या करण्याचा आज सकाळी प्रयत्न केला. या घटनेत रेल्वेच्या धडकेत त्यांची पत्नी व लहान मुलगी असे दोघे जण जागीच ठार झाले. हरिष चौधरी हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचे वृत्त समजताच काही परिचितांनी जखमी हरिष चौधरी यास वैद्यकीय उपचारासाठी नजीकच्या गोदावरी मेडीकल महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

आज सकाळी घडलेल्या या घटनेने साकेगाव परिसरात खळबळ माजली आहे. जखमी हरिष चौधरी याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयत दोघांचे शव विच्छेदनकामी रुग्णालयात नेले. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला आकस्मीक मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते. या परिवाराने आत्महत्येचा हा प्रकार का केला? याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment