गुटखा लूट प्रकरणी तिघांना अटक, दोघांचा शोध सुरु

जळगाव : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील बुरहानपूर येथे एका चारचाकी चालकाला मारहाण करून त्याच्या गाडीतील लाखो रुपये किमतीच्या गुटख्याची लूट करण्यात आली होती. गुटखा लुटीच्या या घटनेत मध्य प्रदेश पोलिसांनी जळगाव येथील मीना बोरसे, सुनीता पाटील या दोन महिलांसह प्रवीण ऊर्फ राहुल पाटील या तिघांना अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन व गुटखा जप्त करण्यात आला आहे. या घटनेतील फरार असलेल्या एक महिला व एक पुरुष अशा दोघांचा शोध सुरु आहे.

1 जुलैच्या सकाळी सहा जणांच्या टोळीने बुरहानपूर येथे महाराष्ट्राच्या सीमेवर चारचाकी चालकाला अडवून त्याला मारहाण करत लाखो रुपयांचा गुटखा लुटून नेला होता. या घटने प्रकरणी शिकारपूर पोलिस स्टेशनला सहा जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनेच्या दिवशी प्रकाश बोरसे याला अटक करण्यात आली होती. 

पुढील तपासाअंती मीना बोरसे, सुनीता पाटील व प्रवीण ऊर्फ राहुल पाटील या तिघांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील राहुल पाटील हा याआधी गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर चालकाचे काम करत होता. त्याच्या टोळीला तोच टिप देत होता असे समजते. अटकेतील चौघांची  खंडवा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here