दरोड्यातील आरोपीस एलसीबी पथकाने केली अटक

On: July 15, 2024 4:49 PM

जळगाव : नंदुरबार पोलिसांना हवा असलेल्या दरोड्यातील आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्याला नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आशिष विलास तायडे (रा. निमगाव ता. यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

तळोदा जिल्हा नंदुरबार येथे दाखल असलेला दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आशिष तायडे हा तो रहात असलेल्या निमगाव येथे लपून बसला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे हे.कॉ. किरण धनगर आणि प्रमोद लाडवंजारी या दोघांनी त्याला शिताफीने जेरबंद केले. त्याला पुढील तपासकामी तळोदा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment