पाण्याची मोटार चोरी करणा-या दोघांना अटक

जळगाव : काही दिवसांपुर्वी ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्यानंतर आता पाण्याच्या मोटार चोरीचा गुन्हा देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला आहे. जळगाव एलसीबी पथकाच्या या सलग कामगिरीने सावखेडा बुद्रुक येथील रहिवाशांमधे समाधानाचे वातावरण पसरले आहे. पाण्याची मोटार चोरी करणा-या शिवाजी श्रावण सोनवणे व राजेंद्र सुनिल पाटील (दोन्ही रा. सावखेडा बु।। ता. जि. जळगाव) अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.

18 जून 2024 च्या रात्री सावखेडा बुद्रुक येथील रहिवासी समाधान विश्राम सोनवणे यांची पाण्याची मोटार कुणीतरी चोरट्यांनी चोरुन नेली होती. दुस-या दिवशी 19 जून रोजी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. मोटारीला लागलेले पिव्हीसी पाईप कापून मोटारीची चोरी करण्यात आली होती. अवघ्या एक महिन्याच्या आत या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बबन आव्हाड यांच्या पथकातील पोहेकॉ. जितेंद्र राजाराम पाटील, नितीन प्रकाश बाविस्कर व पोकॉ बबन प्रकाश पाटील या तिघांनी लावला आहे. पाण्याच्या मोटार चोरीचा गन्हा त्याच गावातील शिवाजी सोनवणे आणि राजेंद्र पाटील या दोघांनी केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. तिघांच्या पथकाने दोघांना शिताफीने ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. अटकेतील दोघांना पुढील रितसर कारवाईकामी जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील सावखेडा बुद्रुक या गावी गेल्या मार्च महिन्यात ट्रॅक्टर चोरीचा एक गुन्हा घडला होता. 11 जुलै रोजी या चोरी प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या समांतर तपासात एलसीबी पथकाने रमेश उर्फ अनिल काशिनाथ सोनवणे या चोरट्याला अटक केली आहे. त्याने जंगलात लपवून ठेवलेला चोरीचा ट्रॅक्टर देखील हस्तगत करण्यात आला. पो.नि. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर आणि बबन पाटील आदींच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला. एकाच वेळी सावखेडा बुद्रुक गावातील चोरीचे दोन गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले आहेत. त्यामुळे सावखेडा बुद्रुक गावातील रहिवाशांमधे समाधानाचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here