एमपीडीए कायद्याखाली चौघांविरुद्ध कारवाई

जळगाव : एमपीडीए कायद्याअंतर्गत रावेर येथील तीन व पिंपळगाव हरेश्वर येथील एक अशा एकुण चौघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.  

रावेर पोलिस स्टेशन हद्दीतील शेख तौसिफ शेख अफजल, आय्युब बशिर तडवी, मगन मुरलीधर करवले आणि पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील मनोहर ऊर्फ मोहन उखडू कोळी अशी या चौघांची नावे आहेत. रावेर पो. स्टे. हद्दीतील शेख तौसिफ शेख अफजल याच्याविरुध्द दारुबंदी कायद्याअंतर्गत 5 गुन्हे दाखल आहेत. त्याला ठाणे कारागृहात स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत करण्यात आला आहे. 

रावेर पो. स्टे. हद्दीतील आय्युब बशिर तडवी याच्याविरुध्द दारुबंदी कायद्याअंतर्गत एकुण पाच गुन्हे दाखल आहेत. त्याला मुंबई कारागृहात स्थानबध्द करण्याबाबतचे आदेश पारीत करण्यात आला आहे. मगन मुरलीधर करवले याच्याविरुध्द दारुबंदी कायद्या अंतर्गत एकुण सहा गुन्हे दाखल आहेत. त्याला मुंबई कारागृहात स्थानबध्द करण्याबाबतचा आदेश पारीत करण्यात आला आहे.

पिंपळगाव हरेश्वर पो. स्टे. हद्दीतील मनोहर ऊर्फ मोहन उखडू कोळी याच्याविरुध्द दारुबंदी कायद्याअंतर्गत नऊ गुन्हे दाखल आहेत. चौघा स्थानबध्द इसमांच्या वर्तनात सुधारणा होण्यासाठी वेळोवेळी प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here