सायबर पोलिस पथकाचे पोलिस अधीक्षकांनी केले अभिनंदन

जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुन्हे आढावा बैठक संपन्न झाली. आजच्या गुन्हे आढावा बैठकीत एकूण 138 अधिकारी – कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

सायबर पोलिस पथकाने दिल्ली येथून दोन आरोपी शिताफीने अटक करुन गुन्हा उघडकीस आणल्या बद्दल या पथकाचे पोलिस अधीक्षकांनी अभिनंदन केले आहे. गेल्या महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेसह इतर सर्व पोलीस अधिकारी कर्मचा-यांनी केलेल्या तपास कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here