नाशिक : गेल्या कित्येक दिवसांपासुन नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीसंदर्भात चर्चेला उधान आले होते. त्यांनी बदलीसाठी अर्ज केला असल्याचे देखील म्हटले जात होते. गणेशोत्सव उत्साहात पार पडताच जवळपास ४५ अधिकाऱ्यांच्या बदलींच्या प्रस्तावावर स्वाक्ष-या करण्यात आल्या. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी दीपक पांडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
रविंद्र कुमार सिंघल यांच्याकडून नाशिकच्या पोलिस आयुक्तपदाचा पदभार नांगरे पाटील यांनी २ मार्च २०१९ रोजी घेतला होता.नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी २ मार्च रोजी संजय दराडे यांच्याकडून सुत्रे हाती घेतली होती. डॉ. आरती सिंह यांची पदोन्नतीवर अमरावतीच्या आयुक्तपदी बदली झालेली आहे. विश्वास नांगरे पाटील यांची विनंती अर्जावरुन बदली झाली असल्याची चर्चा सुरु आहे.
नाशिकचे विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे यांचा कालावधी पुर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांची बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील मुळ निवासी असलेले प्रताप दिघावकर यांची नेमणूक झाली आहे. ३० मे २०१८ रोजी छेरिंग दोरजे यांनी कार्यभार हाती घेतला होता. डॉ. आरती सिंह यांच्या रिक्त जागी अजून कुणाचेही नाव पुढे आलेले नाही.