आठ मोटरसायकलीसह चोरटा जेरबंद

On: July 22, 2024 2:54 PM

जळगाव : चोरीच्या आठ मोटरसायकलींसह भडगाव पोलीस स्टेशन पथकाने चोरट्यास अटक केली आहे. अमोल शांताराम पाटील रा. गिरड तालुका भडगाव असे अटकेतील मोटरसायकल चोरट्याचे नाव आहे. 14 जानेवारी 2023 रोजी दाखल झालेला मोटर सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून या माध्यमातून एकुण आठ मोटरसायकलींचा तपास उघडकीस आला आहे. 

भडगाव, अंकलेश्वर – गुजरात, पाचोरा, कुकशी पोलीस स्टेशन जिल्हा धार मध्य प्रदेश आणि इतर अशा विविध पोलिस स्टेशनला दाखल गुन्हे उघडकीस आले असून त्या गुन्ह्यातील चोरीच्या मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हेड कॉन्स्टेबल किरण पाटील, हिरालाल पाटील, निलेश ब्राह्मणकर, पोलिस नाईक मनोहर जीवन पाटील, सुनील राजपूत, प्रवीण परदेशी आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामीत सहभाग घेतला. पुढील तपास किरण पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment