पुणे : मुख्यमंत्री कार्यालयाने एमपीएससी च्या परिक्षा पुढे ढकलल्या. मात्र तारीख जाहीर केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यामधे संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आयोगाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार २० सप्टेंबर रोजी पुर्व परिक्षा घेतली जाणार होती. ती परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. परीक्षा पुढे ढकलण्याचे अधिकार एमपीएससीला असतांना मुख्यमंत्री कार्यालयाने 26 ऑगस्ट रोजी याबाबत घोषणा केली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र, एमपीएससीने 2 सप्टेबर रोजी अधिकृत घोषणा केली.