विनापरवाना पशुधनाची वाहतुकीविरुद्ध रावेरला कारवाई

जळगाव : विनापरवाना दाटीवाटीने निर्दयीपणे पशुधनाची वाहतुक करणा-या तरुणाविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनच्या पथकाने कारवाई केली आहे. मोहम्मद बिलाल अयुब असे हरयाणा राज्यातील रहिवासी असलेल्या, अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरे वाहतुक करणारा ट्रक आणि म्हशींचे सुमारे 2 ते 3 वर्ष वयोगटातील एकुण 52 पारडे असा 15 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील खरगोन येथून पशुधनाने भरलेला ट्रक पाल मार्गे रवाना होणार असल्याची गोपनीय माहिती रावेर पोलिस स्टेशनचे पो.नि. डॉ. विशाल जायस्वाल यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे 23 जुलै 2024 रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पाल फाट्यावर सापळा रचण्यात आला. पो.नि. डॉ. विशाल जायस्वाल यांच्या पथकातील पो.उप निरी. घनश्याम तांबे, पो. कॉ. प्रमोद पाटील, पो. कॉ. राहुल परदेशी, पो. कॉ. विशाल पाटील, पो. कॉ. महेश मोगरे, पो. कॉ. सचिन घुगे, पो.कॉ रुबाब तडवी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

चालक मोहंमद बिलाल अयुब याच्याविरुध्द रावेर पोलीस स्टेशनला सीसीटीएनस गु.र.नं. 334/2024  महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायदा कलम 6, 9 (अ), महाराष्ट्र पशु कृरता अधिनीयम कलम 11 चे ( 1 ),(D), (F), (K), (E), प्राण्यांचे वाहतुक अधिनीयम 47, 48, 49 महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम 119, मोटार वाहन कायदा कलम 83/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पशुधन तात्पुरत्या स्वरुपात द्वारका गोशाळेच्या ताब्यात सोपवण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी. घनश्याम तांबे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here