इनर व्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपासह नेत्रतपासणी

जळगाव दि.२५ प्रतिनिधी –  इनर व्हील क्लब जळगाव तर्फे जिल्हापेठमधील सु. ग. देवकर प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सोबतच नेत्रतपासणी करुन विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसह आरोग्यविषयी जनजागृती करण्यात आली.इनर व्हील क्लब जळगावतर्फे शालेय विद्यार्थ्यांना मोफत १४० वह्या व १२० रजिस्टर वाटप करण्यात आले. हा उपक्रम सु. ग. देवकर प्रायमरी स्कूल जिल्हापेठ येथे राबविण्यात आला. ह्या उपक्रमाला नगरसेवक अमर जैन यांचे सहकार्य लाभले. ह्या वह्यांसह शैक्षणिक साहित्याचा जवळपास ५५ विद्यार्थ्यांना लाभ झाला. 

डॉ. शीतल अग्रवाल यांनी २४० विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी केली. डोळ्यांचे विकार टाळण्यासाठी काय केले पाहिजे याबाबतही संवाद साधला. शिवाय मुलांनी व्यक्तिगत स्वच्छता करुन आरोग्य चांगले कसे ठेवता येईल यावर देखील त्यांनी संवाद साधला. हया प्रसंगी क्लब अध्यक्षा सौ उषा जैन, सेक्रेटरी निशिता रंगलानी, कोषाध्यक्ष गुंजन कांकरिया, आयएसओ रूचि चांदिवाल, सीसीसी डॉ. शितल अग्रवाल, साधना गांधी, संध्या महाजन, शैला कोचर, डॉ. मयुरी पवार, रितु कोगटा, आबेदा काझी, कंचन कांकरिया, तनुजा मोरे आदी सदस्यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापिका सुषमा साळुंखे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here