लाचखोरीत अडकला सहायक मोटार वाहन निरीक्षक 

जळगाव : जळगाव एसीबी पथकाने केलेल्या सापळा कारवाईत नांदेड प्रादेशिक परिवहन विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षक अडकला असून त्याच्या विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण जवाहर राठोड असे 9 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाचे नाव आहे. 

या घटनेतील तक्रारदार हा नांदेड येथील गुरुकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूल येथे ऑफिस बॉय आहे. ड्रायव्हिंग स्कूल मध्ये वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या 20 प्रशिक्षणार्थी चालकाना  ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये फेल करण्यात आले होते.  फेल झालेल्या चालकांना पास करण्याच्या मोबदल्यात लास्कोर अधिकारी भूषण राठोड याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. 

या तक्रारीची जळगाव एसीबी पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली असता तडजोडी नऊ हजार रुपये देण्या घेण्याचे ठरले. ठरल्यानुसार 9 हजार रुपयांची लाच स्विकारतांना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भुषण राठोड यास जळगाव एसीबी पथकाने रंगेहात पकडले. एसीबी जळगावचे पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्यासह सापळा पथकातील  पो.ना. किशोर महाजन, पो.ना. सुनिल वानखेडे, पो.ना. बाळू मराठे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here