आजचे राशीभविष्य (3/9/2020)

आजचे राशी भविष्य

मेष

कामात व्यस्त असताना अधून मधून थोडा आराम करा. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल.

वृषभ

तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करा. जे तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात, ज्यांना तुमची काळजी आहे अशा लोकांशी नीट वागा. एखादी चांगली बातमी संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे.

मिथुन

उत्तम विनोदबुद्धी ही तुमची धनसंपदा आहे. तिचा वापर करुन तुम्ही तुमची व्यथा पळवून लावाल. मुलांचे यश तुमच्या आनंदात भर पाडेल.

कर्क

कामात झालेल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. परंतू स्वत:ला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे देखील गरजेचे आहे. एखादा दुखावला गेला असेल तर त्याची माफी मागा.

सिंह

जर तुम्हाला वाटते की, तुमच्याकडे पुरेसे धन नाही तर घरातील मोठ्या व्यक्तीकडून धन संचित करण्याचा सल्ला घ्या. आज नातेसंबंध दृढ करण्याचा दिवस आहे.

कन्या

आपल्या हसतमुख स्वभावामुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. आपल्या प्रिय व्यक्तीला न आवडणारे कपडे वापरु नका. तुमच्या जोडीदाराला अधुनमधून सरप्राइझ देत रहा.

तुळ

तुमचे आरोग्य सुधारण्यास प्रयत्न करण्यासाठी लाभदायक दिवस. धार्मिक कामात तुम्ही आपला वेळ घालवण्याचा विचार अमलात आणू शकतात.

वृश्चिक

व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी संपर्क साधा. ते तुम्हाला भविष्याची योग्य दिशा दाखवतील.

धनु

आज तुम्हाला धन लाभ होण्याची दाट शक्यता आहे. परंतु त्याच्या जोडीला तुम्ही दान-पुण्य देखील केले पाहिजे. असे केल्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.

मकर

आरोग्याच्या सुधारणेसाठी पहिल्यापासून प्रयत्न सुरु करण्यास चांगला दिवस आहे. पैश्याची कमतरता कलहाचे कारण ठरु शकते. अशा परिस्थितीत लोकांसोबत विचारपूर्वक बोला.

कुंभ

आपल्या शांत स्वभावामुळे तुम्ही सर्वकाही व्यवस्थित कराल. तुमच्या ‘चलता है’ भूमिकेमुळे तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती वैतागून जाईल.

मीन

रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. प्रेम म्हणजे देवाजी पुजा करण्यासमान आहे. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नव्या संधी मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here