पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट काही कालावधीसाठी हॅकर्सकडून हॅक करण्यात आले होते. हे अकाऊंट त्यांच्या वैयक्तिक वेबसाइटसोबत जोडलेले होते. या अकाऊंटवर त्यांचे 25 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ट्विटर अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकर्सनी बिटकॉइनची मागणी केली होती. हॅकर्सनी ट्विट करून पीएम नॅशनल रिलीफ फंडामध्ये क्रिप्टो चलनाद्वारे देणगीची मागणी केली. काही कालावधीनंतर हे खाते पुन्हा सुरु झाले.

कोरोनासाठी पंतप्रधान मोदी रिलीफ फंडामध्ये तुम्ही देणगी द्या, असे मी आपणास आवाहन करतो असे हॅकर्सनी मोदी यांच्या ट्विटर हॅंडलवर लिहिले होते. पंतप्रधानांच्या ट्विटर हँडलवरुन जवळपास सहा ट्विट करण्यात आले. या सर्व ट्विट्मधे पैशांची मागणी करण्यात आली होती.बिटकॉइन हे एक व्हर्च्युअल चलन आहे. डॉलर, रुपया किंवा पौंड प्रमाणे इतर चलन देखील वापरली जातात. ऑनलाइन देयकाव्यतिरिक्त, डॉलर आणि इतर एजन्सीमध्ये देखील ते बदलता येतात. सन 2009 साली हे चलन बिटकॉइनच्या रुपात पुढे आले. आज या चलनाचा वापर जागतिक पेमेंटसाठी केला जातो.

जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात अमेरिकेतील अनेक बड्या व्यक्तींची देखील ट्विटर खाते हॅक करण्यात आले होते. यात अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, जगातील सर्वात श्रीमंत वॉरेन बफे यांचा या यादीत समावेश आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार जो बिडेन यांचे ट्विटर हँडल देखील हॅक करण्यात आले होते. आयफोनचा निर्माता ऍपलही या सायबर हल्ल्यात सापडले होते. त्यांना देखील त्यावेळी बिटकॉन चलनाची मागणी करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here