बाउन्सर्स बोलावून कामगारांना मारहाण

On: September 3, 2020 10:54 AM

नाशिक : नाशिकच्या इगतपुरी वाडीवऱ्हे औद्योगिक वसाहतीत एक निंदनीय घटना घडली आहे. किमान वेतन आणि पगार वाढ या मूलभूत अधिकारांची मागणी करणार्‍या कर्मचार्‍यांना कंपनी मालकाच्या वतीने बाउन्सर बोलावून मारहाण करण्यात आली. नाशिकच्या वाडीव-हे येथील फेब्रिकेशनचे काम करणाऱ्या फॅब कंपनीत हा प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला असल्याचे समजते. या प्रकरणी नाशिकच्या वाडीव-हे पोलिस स्टेशनला व्यवस्थापक सचिन चाफेकर विरोधात कामगारांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment