मोबाईल चोरट्यास चाळीसगावला अटक

On: August 1, 2024 7:45 PM

जळगाव : चाळीसगाव शहरातील कापड दुकानदाराच्या घरातून दोन मोबाईल चोरी करणा-या  चोरट्यास चाळीसगाव शहर पोलीसांनी अटक केली आहे. तुफेल रजा मेमन (रा. गफ्फार चाळ, कसाईवाडा, कुर्ला, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव आहे.

शंकर अंबुमल वाधवा यांच्या चाळीसगाव येथील सिंधी कॉलनी येथील घरातून दोन मोबाईल चोरी झाले होते. या घटनेप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चाळीसगाव शहर  पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेच्या तपासात हा गुन्हा कुर्ला मुंबई येथील रहिवासी तुफेल रजा मेमन याने केल्याचे गोपनीय बातमीदाराकडून हे.कॉ. अजय पाटील व पो.कॉ. अमोल भोसले यांना समजले.

पो.नि. संदीप पाटील यांच्या गुन्हे शोध पथकातील स.फौ. विश्वास पाटील, पो.हे.कॉ. अजय पाटील, पो.ना. दिपक पाटील, पो. कॉ. अमोल भोसले, गणेश कुवर, अमोल पाटील आदींनी चाळीसगाव शहर रेल्वे स्टेशनच्या माल धक्का परिसरातून तुफेल मेमन याला शिताफीने ताब्यात घेत चौकशी केली. त्याने आपला गुन्हा कबुल करत चोरीचे दोन्ही मोबाईल काढून दिले. त्याला अटक करण्यात आली  असून पुढील तपास पोहेकॉ अजय पाटील, पो. कॉ. अमोल भोसले करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment