एक पेड मां के नाम – गांधी रिसर्च फाउंडेशन – जैन इरिगेशनचा उपक्रम

वावडदा, जळगाव. दि. ३ (प्रतिनिधी) : माझी वसुंधरा अभियान 5.0  अंतर्गत पृथ्वी या तत्त्वावर  वृक्ष लागवडीसाठी रोपे तयार करून वृक्ष लागवडी चा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड यांचा मानस आहे. माध्यमिक विद्यालय वावडदा ता. जि. जळगाव या शाळेत वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रम उत्साहात  गांधी रिसर्च फौंडेशन व माध्यमिक विद्यालय वावडदा याच्या  संयुक्त विद्यमानाने ने  हाती घेतला आहे.

वन महोत्सव कार्यक्रम अंतर्गत व एक पेड मां के नाम या धोरणानुसार शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या शाळेच्या परिसरात करंज,आवळा,आंबा, सीताफळ, पिंपळ,निबं, साग, सेतू, जास्वंद, चिंच या 10 प्रकारची 50 झाडें मान्यवराच्या हस्ते लागवड करण्यात आली आहे या कार्यक्रमा प्रसंगी सेवानिवृत्त वन   अधिकारी तथा सल्लागार  वन, वन्यजीव व पर्यावरण विभाग जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड चे राजेंद्र राणे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सर एन. आर. दाणे सर शिक्षक ऐ. डी. पाकले सर,एम.डी.अहिरे मॅम,एम.आर. चौधरी,एस.बी. पाटील,ऐ. एम पाटील, कुंदन पाटील व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.  

प्रत्येक विध्यार्थ्यांने एक मुलं एक झाड ही संकल्पना प्रत्येक विध्यार्थ्यांने राबविली पाहिजे तसेच प्रत्येक विध्यार्थ्यांने आपल्या घरा जवळ एक झाड लावून त्या झाडाचे जतन करावे असे आव्हान विध्यार्थ्यांना करण्यात आले या कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फौंडेशन चे क्षेत्रीय अधिकारी विक्रम अस्वार व रामदेववाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते जीवन राठोड यांनी कार्यक्रमा साठी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here