पोलिसांचा अपमान सहन करणार नाही – निलेश राणे

On: September 3, 2020 2:30 PM

मुंबई : बॉलिवूड माफियांपेक्षा आपल्याला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे अभिनेत्री कंगना रणौत या नटीने म्हटलं होते. कंगनाच्या या वक्तव्यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी तिला कडक शब्दात सुनावले आहे. आमच्या मुंबई पोलिसांचा अपमान सहन केला जाणार नसल्याचे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

निलेश राणे यांनी याबाबत ट्विट करतांना म्हटले आहे की म्हटलं आहे की 2-3 अधिकारी प्रेशरमध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस खाते दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्या इतकी कंगना राणौत कोण लागून गेली? सुशांतसिंग राजपूत आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या बाजूने आम्ही आहोत. आमच्या पोलिसांचा अपमान सहन केला जाणार नसल्याचे राणे यांनी म्हटले आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment