जबरी लुट करणारा फरार आरोपी पिस्टलसह ताब्यात

नाशिक : जबरी लुटीच्या गुन्हयातील फरार सराईत गुन्हेगारास देशी बनावटीच्या पिस्टल व एक जिवंत काडतुसासह नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुरुषोत्तम उर्फ गग्गा गिरी असे इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील रहिवासी असलेल्या व अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुध्द इगतपुरी पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम 3/21 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटकेतील आरोपी पुरुषोत्तम उर्फ गग्गा हा नुकताच मध्यवती कारागृहातून जामीनावर सुटला होता. इगतपुरी येथील एका दुकानदारास जबर मारहाण करुन त्याच्या ताब्यातील रोकड लुटून नेल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध इगतपुरी पोलीस स्टेशनला जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय वाडीव-हे पोलीस स्टेशनला दाखल चोरी व आर बॅक च्या गुन्ह्यात देखील पुरुषोत्तम फरार होता. त्याच्याविरुद्ध इगतपुरी, घोटी आणि वाडीव-हे अशा तीन पोलीस स्टेशनला मिळून एकूण आठ गुन्हे नोंद आहेत. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकातील सपोनि गणेश शिंदे, पोलीस अंमलदार विनोद टिळे, प्रकाश कासार, संदिप झाल्टे, आबा पिसाळ, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, भाऊसाहेब टिळे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here