अ‍ॅमेझॉन करणार ड्रोनने डिलिव्हरी

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेली अ‍ॅमेझॉन लवकरच ड्रोनच्या माध्यमातून सामानाची डिलिव्हरी करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. ड्रोनद्वारे ग्राहकांना अवघ्या तिस मिनिटात सामानाची डिलीव्हरी होणार आहे. अ‍ॅमेझॉनला पार्ट 135 एअर कॅरिअर सर्टिफिकेट प्राप्त झाले आहे. त्यामुळे कंपनी प्राइम एअर ड्रोन्स वापरण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या एफएएने अ‍ॅमेझॉनला ड्रोनमार्फत पॅकेज डिलिव्हरीसाठी परवानगी दिल्याचं म्हटले आहे.अ‍ॅमेझॉनकडून सध्या ड्रोनच्या उड्डाणासह इतर गोष्टींचे परीक्षण सुरु आहे. सामानाची ड्रोनमार्फत डिलिव्हरी नेमकी कधी सुरू केली जाणार याबाबत कंपनीने खुलासा केलेला नाही. ड्रोनच्या मदतीने सामानाची डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here