5800 गायींना नेणारे जहाज बुडाले ; 43 पैकी 1 वाचला

टोकिओ : आज पहाटे जपानच्या दक्षिणेकडे 5800 गायींना घेऊन जाणारे जहाज बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत 5800 गायी तसेच 42 कर्मचारी बुडाले. एकुण 43 कर्मचा-यांपैकी केवळ एक कर्मचारी वाचला आहे. समुद्रात हे जहाज बेपत्ता होण्यापुर्वी खराब हवामानात अडकले असल्याचा संदेश रवाना करण्यात आला होता. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना जहाजावरील एका कर्मचाऱ्याला पाण्यातून वाचवण्यात यश आले.

बचावलेला कर्मचारी फिलिपिन्सचा नागरिक आहे. जहाजावरून संदेश आल्यानंतर जपानच्या तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर त्या दिशेने झेपावले. त्यावेळी हेलिकॉप्टरमधील अधिकाऱ्यांना समुद्रात लाईफ जॅकेट घालून गटांगळ्या खाणारा एक जण जगण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून आले. गल्फ लाईवस्टॉक 1 या जहाजाने बुधवारी पहाटे हा संदेश रवाना केला होता. या जहाजाचे वजन सुमारे 11,947 टन होते. या जहाजात 5800 गायी होत्या. पूर्व चीन समुद्राच्या अमामी ओशिमाच्या तटाजवळून हे जहाज मार्गक्रमण करत होते.

या परिसरात मेसक चक्रीवादळ सुरु होते. यामुळे चक्रीवादळामुळे हवामान खराब होत असते. या जहाजात नेमका काय बिघाड झाला होता याची माहिती मिळू शकली नाही. जहाजात 38 फिलिपाईन्स, 2 न्युझीलंड आणि एक ऑस्ट्रेलियाचा असे एकुण 41 कर्मचारी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here