बकऱ्या चोरी करणाऱ्यास अटक 

On: August 22, 2024 7:54 PM

जळगाव : बकऱ्या चोरी करणाऱ्या चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध पथकाने मध्य प्रदेशातून अटक केली आहे. रेवलसिंग आर्या (पावरा) असे अटक करण्यात आलेल्या बक-या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या सहा बकऱ्या हस्तगत करण्यात आल्या. पुढील तपासकामी त्याला चोरीच्या बक-यांसह चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, श्रेणी पोउनि अनिल जाधव, हॅ.कॉ. दिपक माळी, रविंद्र पाटील, विलेश सोनवणे, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, प्रदिप चवरे, दिपक चौधरी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment