सहायक फौजदाराच्या मुलाची प्रेमाच्या त्रिकोणात हत्या  

On: August 23, 2024 2:45 PM

नाशिक : सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराच्या मुलाची लव्ह ट्रँगल अर्थात प्रेमाच्या त्रिकोणात हत्या झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्याने नाशिक परिसरात खळबळ माजली आहे. गगन प्रवीण कोकाटे (रा. राधेश्याम निवास, वृंदावननगर, म्हसरुळ नाशिक) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिक्षिका असलेल्या प्रेयसीने सुपारी देऊन गगन कोकाटे याची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मेरी वसाहतीच्या कॉलनी रोडवर गगन याचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी अवघ्या पाच तासांत संशयित महिलेसह चौघा संशयित हल्लेखोरांना अटक केली आहे.

या हत्येप्रकरणी संशयित आरोपी भावना सुशांत कदम (रा. वृंदावननगर नाशिक) हिच्यासह संशयित संकेत शशिकांत रणदिवे, महेफुज दिलीप सपकाळे, रितेश दिलीप सपकाळे (सर्व रा. अशोकनगर, सातपूर), गौतम सुनील दुसाने (रा. शहीद सर्कल, गंगापूर रोड) यांना अटक करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार गगनच्या घराशेजारीच संशयित भावना कदम रहात होती. गगन व भावना यांची सुरुवातीला मैत्री झाली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. गेल्या चार-पाच वर्षापासून दोघांचे प्रेमसंबंध सुरु होते. दरम्यानच्या काळात दोघात तिसरा आला आणि त्यांच्यात वादाची ठिणगी पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे गगन तिला त्रास देऊ लागला. अखेर प्रेमाच्या त्रिकोणातून गगनची हत्या झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment