पत्नीची हत्या करत पतीने संपवले स्वतःला

On: August 28, 2024 8:26 AM

जळगाव : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिची हत्या करत स्वतःही गळफास घेत पतीने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे प्र.दे. येथे मंगळवारी उघडकीस आली आहे. लक्ष्मीबाई व गोपाल पावरा उर्फ बारेला असे मयत पती-पत्नीचे नाव आहे.

तळोंदे प्र.दे. शिवारातील शिवाजी पाटील (रा. पिंप्री बुद्रूक प्र.दे.) यांच्या शेतात असलेल्या खोलीत गोपाल पावरा उर्फ बारेला हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच लक्ष्मीबाई हिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून तिचा दोरीने गळा आवळल्याचे दिसून आले. या घटनेप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला मयत गोपाल पावरा याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment