जळगावला वेश्या व्यवसायावर कारवाई 

sex racket imaginary image

जळगाव : जळगाव एमआयडीसी परिसरात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने कारवाई केली असून पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. मंगळवार 27 ऑगस्टच्या रात्री टाकण्यात आलेल्या छाप्यात हॉटेल मालक व चालक अशा दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. 

जी सेक्टर मधील सागर हॉटेल व लॉजिंग या ठिकाणी हा वेश्या व्यवसाय सुरु होता. याबाबत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती समजली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वेश्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले साहित्य या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आले. पोलिसकर्मी सपना येरगुंटला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हॉटेल मालक सागर नारायण सोनवणे आणि चालक सागर सुधाकर पाटील या दोघांविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय बडगुजर, पोलीस नाईक विकास सातदिवे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा तेली, पोहेकॉ मुकुंदा पाटील, रामदास कुंभार, विनोद भास्कर, भरत डोके आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here