नाशिक (प्रतिनिधी) – सोनार समाजातील संभाव्य घटस्फोटाचे प्रमाण कमी व्हावे, किंबहुना घटस्फोट ही संकल्पना सोनार समाजातून नामशेष व्हावी, या उद्देशाने पुणे येथील अनुभवी विधी सल्लागार तसेच सोनार समाजसेवक बंधू ॲड श्री जगदीश बी विसपुते यांनी सकल भारतीय सोनार विवाह निश्चिती समुपदेशन समिती व्हॉट्सॲप समूहात होत असलेल्या चर्चेच्या अनुषंगाने पुणे येथे पर्वती परिसरात सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात होणाऱ्या विधी सल्ला समुपदेशनाचा लाभ सोनार समाजास होत आहे.
विधी सल्लागार बंधू ॲड श्री स्वप्निल विसपुते आणि अन्य सोनार विधी सल्लागार बांधव, भगिनी यांनी नाशिक येथेही असे समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यवतमाळ, धुळे, अकोला, अमरावती, मुंबई, नवी मुंबई , ठाणे, उदगीर तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असे समुपदेशन केंद्र लवकरच सुरू करण्याची इच्छा स्थानिक विधी सल्लागार सर्व शाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनी यांनी आमच्याकडे व्यक्त केली आहे, अशी माहिती सकल भारतीय सोनार समाज संघटन चे संस्थापक मिलिंदकुमार सोनार यांनी दिली.
संपूर्ण भारतात तालुका आणि जिल्हा स्तरावर सकल भारतीय सोनार समाज संघटन आणि सेतुबंधन मध्ये समाविष्ट असलेल्या विविध सोनार, सोनी, स्वर्णकार समाज संस्था आणि संघटना यांच्यातर्फे सामूहिक प्रयत्नांतून सोनार, सोनी, स्व वर्ण कार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्र सुरू व्हावेत, यासाठी संपूर्ण भारतात विधी सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या सर्व शाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनी यांनी आपला कार्यपरिचय ९७६४९५७३६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.
सोनार, सोनी, स्वर्णकार आपण सर्वजण एकोपा, सलोखा आणि सौहार्द हे सकल भारतीय सोनार समाज संघटन चे ब्रीद अंगिकारून सकल भारतीय सोनार समाज संघटन चे विविध व्हॉट्सॲप समूहात समाविष्ट असल्याबद्दल सकल भारतीय सोनार समाज संघटन आणि सेतुबंधन मध्ये समाविष्ट असलेल्या विविध सोनार, सोनी, स्वर्णकार समाज संस्था आणि संघटना यांच्यातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात अभिनंदन करतानाच समूहात समाविष्ट असलेल्या सर्वानाच एकमेकांचा सार्थ अभिमान अवश्य वाटावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.