चोरीच्या चार मोटरसायकलींसह चोरट्यास अटक 

On: August 29, 2024 10:36 PM

जळगाव : चोरीच्या चार मोटारसायकलींसह चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरणगाव येथील तिरंगा चौकातून ताब्यात घेत अटक केली आहे. जाबीर शहा भिकन शहा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मलकापूर, मुक्ताईनगर आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकनार पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोउपनिरी दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, पोहॅकॉ सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, भारत पाटील, दिपक चौधरी आदींनी या तपासणी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment