‘महिला सुरक्षा’ या विषयावर चर्चासत्र – इनरव्हील क्लब जळगाव व रोटरी राॅयल्सचा संयुक्त उपक्रम

जळगाव दि. ३० (प्रतिनिधी) – ‘आपल्या मुलांना महिलांशी आदरपूर्वक वागण्याची शिकवण पालकांनी द्यावी, मुलांशी वार्तालाप वाढविणे अत्यंत आवश्यक आहे…’ असा सूर चर्चासत्रात उमटला. इनरव्हील क्लब ऑफ जळगाव व रोटरी राॅयल्स जळगाव यांच्या वतीने ‘महिला सुरक्षा’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. 

प्राप्त परिस्थिती बघता अनेक ठिकाणी महिलांवर बलात्काराच्या घटना घडत आहेत. ‘महिलांची सुरक्षा’ ही एक सामाजिक समस्या उद्भवली आहे, या समस्येवर सर्वांच्या प्रयत्नाने तातडीने मात करण्याची आवश्यकता आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन यांनी केले. चर्चासत्र प्रश्न-उत्तरांच्या स्वरुपात झाले इनरव्हील क्लबतर्फे निता जैन व दिप्ती अग्रवाल व रोटरी राॅयल तर्फे गुरदीप सिंग अहलुवालिया, सचिन पटेल, डाॅ. बिंदू छाबडा व नैन लाहोरी यांनी या चर्चासत्रात सहभाग नोंदविला. रोटरी राॅयल्सच्या अध्यक्षा वर्षा रंगलानी यांनी प्रश्न विचारले. या चर्चासत्रात  वक्त्यांनी खालील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.

निता जैन : अशा घटनांवर त्वरित गुन्ह नोंदवून अॅक्शन घेतली गेली पाहिजे. दिप्ती अग्रवाल : महिलांनी संरक्षणाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. सचिन पटेल : पालकांनी मुलांशी वार्तालाप वाढविला पाहिजे. डाॅ. बिंदू छाबडा : पालकांनी आपल्या मुलांना महिलांशी आदरपूर्वक वागायला शिकवले पाहीजे. नैन लाहोरी : महिलांनी नेहमी मिरपुड स्प्रे स्वत:जवळ बाळगले पाहिजे. गुरदीप सिंग अहलूवालिया : महिला सुरक्षेच्या कायदे विषयक माहिती काही उदाहरणांसहित दिली. 

कार्यक्रमास इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन, सचिव निशिता रंगलानी, रोटरी रॉयल्सच्या अध्यक्षा वर्षा रंगलानी, सचिव स्नेहा ग्यानचंदानी, पिंकी मंधान तसेच दोन्ही क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here