जळगाव : येथील रावसाहेब रुपचंद विद्यालय जळगाव या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे कार्यकारणी सदस्यांसह विद्यार्थ्यांची इंटरॅक्ट क्लब यासाठी निवड करण्यात आली. कार्यक्रमास रोटरीचे अध्यक्ष रो.छाया पाटील, सेक्रेटरी रो. किरण सिंग, माजी अध्यक्ष रो. आर.एन. कुलकर्णी, प्रा.दिलीप भारंभे, रो. हेमंत पाटील, रो. श्रीरंग पाटील तसेच रावसाहेब रूपचंद विद्यालयाचे मुख्याध्यापक यू.बी.जाधव सर, इंटरॅक्ट क्लबचे प्रमुख योगेश गंभीर चौधरी, उपप्रमुख गिरीश भावसार व सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमात रोटरीचे माजी अध्यक्ष आर. एन .कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले इंटरॅक्ट क्लब स्थापन करण्याचे फायदे सांगितले. तसेच नेतृत्व विकासाचे संकल्पना स्पष्ट केली. प्राध्यापक दिलीप भारंबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून बोलण्याचे कौशल्य स्पष्ट केले. या कार्यक्रमास किशोर सोनवणे नीलिमा ढोले यांनी सहकार्य केले. समन्वयक गिरीश भावसार यांनी सूत्रसंचालन केले तर या इंटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष म्हणून राजस धनंजय चौधरी उपाध्यक्ष शिवम शरद पाटील सचिव कैरवी दिलीप पाटील इतर सभासद चंद्रशेखर तुकाराम पाटील, अंकिता संजय चौधरी, डेलिषा किरण पाटील, प्रची किशोर सारस्वत, सेजल राकेश महाजन, नेहा प्रदीप नाईक, मृणाली प्रभाकर जाधव, गौरव योगेश चौधरी, अमृता विनोद वाणी, तनुश्री रवींद्र दहाड या सदस्यांनी सहभाग घेतला.
इंटरॅक्ट क्लब या कार्यक्रमात रोटरीचे अध्यक्ष रो. छाया पाटील यांनी आपल्या नावीन्यपूर्ण कल्पना वास्तवात येण्यासाठी कुठलीही अडचण असल्यास आपण रोटरीचे सदस्यांशी संपर्क करावा असे आवाहन केले. तसेच आपल्या मागणीनुसार विविध कार्यक्रम घेण्याचे आश्वासन दिले विशेष मार्गदर्शन लाभले आभार इनटरॅक्ट प्रमुख योगेश चौधरी यांनी केले.