तामिळनाडू येथील फटाका कारखान्यात स्फोट

On: September 4, 2020 2:30 PM

तामिळनाडू राज्याच्या कुड्डालोर जिल्ह्याच्या कट्टुमन्नारकोइल शहरात फटाकाच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 9 जण मृत्युमुखी तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली. हा भिषण स्फोट नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याच तपशील मिळू शकला नाही.या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा फटाक्यांचा कारखाना कट्टुमन्नारकोइल या शहरात आहे. चेन्नईपासून 190 कि.मी. अंतरावर हे शहर आहे.

या दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. या स्फोटाचा आवाज सुमारे तीन किलोमीटरपर्यंत गेला. या आवाजामुळे अनेक लोक घाबरुन घरातून बाहेर आले. स्फोटामुळे कारखान्याचे मोठ्य प्रमाणात नुकसान झाले आहे. या स्फोटामुळे संपूर्ण इमारत कोसळली असून मृतांमध्ये कारखान्याच्या मालकाचा देखील समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment