सुप्रसिद्ध पोलिस अधिकारी संतोष रस्तोगी यांच्या कन्येचा आढळला मृतदेह 

लखनौ : जळगावचे माजी पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी यांची कन्या अनिका हिचा मृतदेह उत्तर प्रदेशच्या लखनौ येथील वसतिगृहाच्या खोलीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संतोष रस्तोगी हे सध्या दिल्ली येथे राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) चे महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. 

अनिका ही लखनौ येथील राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विधि विद्यापीठाची तृतीय वर्षांची विद्यार्थिनी होती. तिचे वडील संतोष रस्तोगी हे 1998 च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. शिस्तप्रिय आणि लोकप्रिय असलेले पोलीस अधिकारी संतोष रस्तोगी हे  जून 2097 ते एप्रिल 2010 या कालावधीत जळगावचे जिल्हा पोलिस अधीक्षक होते.

वसतिगृहाच्या खोलीतील जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या अनिका रस्तोगी हिला शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. अनिकाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिच्या अंगांवर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळल्या नाहीत. आतून बंद असलेल्या वसतिगृहाच्या खोलीत संशयास्पद स्वरुपात काहीही आढळून आले नाही. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here