भुसावळ येथे मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात

जळगाव : भुसावळ तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन तर्फे खेळाडूंचे स्फूर्ती स्थान असलेले मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात झाली. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांची जयंती 29 ऑगस्ट राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरी केली जाते. याप्रसंगी भुसावळ तालुका अ‍ॅथेलेटीक्स असोसिएशनच्या वतीने अटल गार्डन येथे सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच विविध खेळात प्राविण्य मिळालेल्या खेळाडूंचा सत्कार राहुल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्रमुख अतिथी श्रेयस इंगळे, विशाल जंगले यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी शॉर्टपुट ऑल इंडिया वेस्ट झोन खेळाडू सुजल शुक्ला, स्टेट लेवल थाळीफेक खेळाडू गौरी लोहार, प्रसाद सोनवणे, आदित्य मराठे, प्रसाद शर्मा या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या परिवाराच्या निरोगी आयुष्यासाठी विविध प्रकारची झाडे लावण्याचे आवाहन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्रसिंग पाटील यांनी यावेळी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत निकम, सचिव रवींद्र चोपडे, कार्यकारी सचिव गोपीसिंग राजपूत, योगेंद्र हरणे, ट्रेनर ममता जांगिड, ट्रेनर इरफान शेख, किरण पाटील, राकेश शर्मा, दिगंबर कुबडी, डोंगरसिंग महाजन तसेच भुसावळ विभागातील खेळाडूंनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन रमण भोळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here