पोलिसांना मारहाण करणा-यास पोलिस कोठडी

On: September 3, 2024 4:21 PM

जळगाव : चोपडा येथील मरीआईच्या उत्सवात गडबड, गोंधळ घालून पोलिसांनाच चापटा बुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ, तसेच जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. रवींद्र ज्ञानेश्वर मोरे (कोळी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याला दोन दिवस पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

1 सप्टेबर रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास हातेड खु. ता. चोपडा या गावी मरीआईच्या उत्सवानिमित्त लोकनाट्य सुरु होते. या लोकनाट्यात महिलांचे नृत्य सुरु होते. रसिक प्रेक्षक या नृत्याचा आंनद घेत असतांना रविंद्र ज्ञानेश्वर मोरे (कोळी) हा मंचावर चढण्याचा प्रयत्न करत होता. बंदोबस्तावरील पोलिस चेतन सुरेश महाजन यांनी त्याला खाली उतरवून समोर बसवले.

तरीदेखील तो प्रेक्षकांमधे उभा राहून मोठमोठ्याने आरडाओरड करतच होता. त्याच्या अशा कृत्यामुळे मागे बसलेल्या प्रेक्षकांचा रसभंग सुरु होता.  पोलिसांनी त्याला खाली बसण्यास सांगितले असता त्याने पोलिसाची कॉलर पकडून दमदाटी व मारहाण केली.

पोलिसकर्मी विशाल पाटील हे दोघांची झटापट सोडवण्यास आले असता त्यांचीसुद्धा रवींद्र मोरे याने कॉलर पकडून झटापट केली. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर रवींद्र मोरे फरार झाला होता. त्याला 2 सप्टेबर रोजी पहाटे अटक करण्यात आली आहे. चोपडा न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment