घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघांना मुद्देमाल व साहित्यासह अटक 

जळगाव : रावेर पोलिस स्टेशन हद्दीत घरफोडी करणाऱ्या दोघांना मुद्देमाल व घरफोडीसाठी लागणाऱ्या साहित्यासह अटक करण्यात आली आहे. गोलुसिंग नसीबसिंग पटवा (रा. पाचौरी ता. खकनार ह मु. ओझर बेडीपुरा मोहल्ला ता राजपुर जि. बडवाणी – मध्यप्रदेश) आणि सुनिलसिंग कैलाससिंग बरनाल (रा गंदवाणी ता जि.धार – मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांच्या अटकेमुळे रावेर पोलीस स्टेशनला दाखल घरपोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. 

रावेर येथील श्रीकृष्ण नगर भागातील एका बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोने चांदीचे दागिने व रोख रुपये असा एकूण 22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता. या घटने प्रकरणी 6 सप्टेंबर 2024 रोजी रावेर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या पथकातील पोउनि तुषार पाटील, पोउनि धनश्याम तांबे, पोहेकॉ ईश्वर जुलालसिंग चव्हाण, पोकॉ सचिन जर्नादन घुगे, पोकॉ सुकेश शब्बीर तडवी, विकारोद्दीन गयासोद्दीन शेख, पो कॉ अमोल राजेंद्र जाधव, विशाल शिवाजी पाटील, महेश मंगलदार मोगरे, प्रमोद सुभाष पाटील आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व अज्ञात आरोपींचा शोध घेत होते. 

दरम्यान रावेर ते सावदा रस्त्यावर एस एस विवेच्या पेट्रोल पंपा जवळ गैबानशहा बाबा दर्गा टेकडी खाली गोलुसिंग नसीबसिंग पटवा आणि सुनिलसिंग कैलाससिंग बरनाल हे दोघे पोलीस पथकाला संशयास्पद अवस्थेत आढळून आले. त्यांच्या कब्जात एक मोटरसायकल, स्क्रू ड्रायव्हर, लहान बॅटरी (टार्च), टोकदार पार, लोखंडी पोपटी पान्हा असे घरफोडीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलीस कोठडी दरम्यान चौकशी व तपासाअंती त्यांच्या कब्जातून गुन्ह्यातील तीन हजार रुपये किमतीचे सहा दहा वजनाचे पायातील चांदीचे पैंजण व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 78 हजार 360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here