वरणगाव फॅक्टरी सुपरवायझर खूनप्रकरणी एकास अटक

On: September 12, 2024 10:12 AM

जळगाव : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये सुपरवायझर पदावर कार्यरत असलेले आणि फॅक्टरी इस्टेट मधील रहिवासी प्रदीप जयसिंग इंगळे यांचा दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास खून झाल्याची घटना उघडकीस आली. लाकडी बॅट व इतर वस्तूंनी त्यांना मारहाण करून जीवे ठार केल्याप्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे.

प्रदीप इंगळे हे दुपारच्या वेळी जेवणासाठी शासकीय क्वार्टर मधे आले असता त्यांचा लाकडी बॅट व इतर वस्तूने मारून खून करण्यात आला. वरणगाव पोलिसांना या घटनेची माहिती समजताच एपीआय भरत चौधरी, पीएसआय गांगुर्डे, पीएसआय सुशील सोनवणे, पोहेकॉ संदीप बनसोडे, सुखराम सावकारे, होमगार्ड राम चौधरी, महेश चौधरी आदींनी घटनास्थळी भेट देत पुढील कारवाई व तपास सुरु केला. घटनेचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment