नाशिक परिसरातील मोटार सायकल चो-या पारोळा पोलिसांनी केल्या उघड

On: September 13, 2024 5:57 PM

जळगाव : नाशिक शहर परिसरातून मोटरसायकली चोऱ्या करुन त्या चोरीच्या मोटारसायकली पारोळा शहर परिसरात विक्री करणाऱ्या चोरट्यास पारोळा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या 19 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. किशोर संजय चौधरी (रा. तरवाडे ता. पारोळा ह.मु. सातपुर कॉलनी, नाशिक) असे अटकेतील मोटरसायकल चोरट्याचे नाव आहे. 

नाशिक परिसरातून चोरी केलेल्या मोटरसायकली किशोर चौधरी हा पारोळा परिसरात कमी किमतीत विकत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्याचा शोध सुरू होता. तो पुन्हा पारोळा पोलीस स्टेशन हद्दीत चोरीची मोटरसायकल विक्री करण्यास येणार असल्याचे देखील पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना समजले होते. त्यानुसार त्यांच्या अखत्यारीतील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक राजु विठठल जाधव, पोहेकॉ.  प्रविण विश्वास पाटील, पो.ना. संदिप सातपुते, पो.कॉ. अभिजित पाटील असे सर्वजण तीन दिवसापासून त्याच्या मागावर होते. 

12 सप्टेंबर रोजी पारोळा शहरातील कजगाव रस्त्यावर असलेल्या आकाश मॉल परिसरातून त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती मोटार सायकली चोरीचे गुन्हे त्याने कबुल केले. नाशिक शहर व परिसरातील विविध पोलीस स्टेशन कडील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment