जळगाव – येथील रोटरी क्लब जळगाव मिडटाऊनतर्फे शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. गणपती नगर येथील रोटरी हॉल मध्ये शिक्षण तज्ञ प्रा. शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते शिक्षकांसह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्तविक सचिव रो.किरण सिंग यांनी केले. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा रो. छाया पाटील, माजी अध्यक्ष रो.आर एन कुलकर्णी, प्रोजेक्ट चेअरमन रो.डॉ.उषा शर्मा, रो.सुनंदा देशमुख, रो.डॉ.हर्षदा मयुरेश पाटील, सचिव रो.किरण सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे शिक्षण तज्ञ प्राध्यापक शरदचंद्र छापेकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि, मनाची मशागत करणे म्हणजेच संस्कार होय. विद्यार्थ्यांवर हे संस्कार करण्याचे काम शिक्षक अधिक प्रभावीपणे करतात. संस्कारशील पिढी घडवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असतो असे त्यांनी सांगितले. देशाला वैभवशाली बनविण्यासाठी तसेच सुसंस्कृत व कर्तव्य दक्ष पिढी घडविणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे हे रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन सारख्या सामाजिक संस्थाचे काम आहे असे अध्यक्ष रो. छाया पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी चित्रकला शिक्षिका दिपीका ईश्वर वराडे, मोहन संतोष सोनवणे, कामिनी सुशील पवार, दिपाली प्रभाकर देवरे, वैशाली छगन धांडे, सविता सुरेश वारुळे, हर्षाली राजीवकुमार पाटील, सुवर्णलता उत्तम अडकमोल, योगेश गंभीर चौधरी, विशाल रमेश जाधव, सुवर्णा भिला पाटील, स्काऊट शिक्षक गिरीष रमणलाल भावसार, वैशाली हंसराज शिंदे, नितीन मधुकर पाटील, प्रा. ए. जी. सराफ, राजेंद्र रामकृष्ण बावस्कर, डॉ अनिता अविनाश कोल्हे, फौजिया तारीक शेख, संजय उखर्डू पाटील, योग शिक्षक अश्विन नवनीतलाल गांधी, अमोल अंबादास पाटील, अरुण देवराम चौधरी,
हेमेंद्र रामचंद्र सपकाळे, योग शिक्षिका रिद्धी सचिन शेठ यांना मानपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी रो. डॉ. के. सी.पाटील, रो. ॲड.संजय पाटील, रो.डॉ. अपर्णा मकासरे, रो.डॉ.उषा शर्मा, रो.डॉ.सुमन लोढा, रो.सुनंदा देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. ऊषा शर्मा यांनी करून दिला. सूत्र संचालन सुनंदा देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार रो. डी. ओ.चौधरी यांनी मानले.