चोरीच्या पाच मोटार सायकलींसह चोरट्यास अटक

On: September 18, 2024 11:56 AM

जळगाव : चोरीच्या पाच मोटार सायकलींसह एकास भडगाव पोलिसांनी अटक केली आहे. उमेश बबन पाटील (रा.गाळण) असे अटक करण्यात आलेल्या मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे. भडगाव पोलीस स्टेशनला दाखल मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात चार मोटरसायकल चोरीचा तपास उघडकीस आला आहे. भडगाव पोलीस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचे तीन, पारोळा पोलीस स्टेशनला दाखल एक आणि एक अनोळखी अशा एकुण पाच मोटार सायकली चोरट्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, स.फौ. हिरालाल नारायण पाटील, पोहेकॉ मनोहर जिवन पाटील, निलेश भालचंद्र ब्राम्हणकर, पोकॉ सुनिल जयसिंग राजपुत, प्रविण परदेशी, कुंदन संजय राजपुत यांनी या तपासात सहभाग घेतला. पुढील तपास सफौ हिरालाल पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment