वाळूमाफियाचा हवेत गोळीबार – नऊ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव : गिरणा नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा सुरु असताना कोतवालाने फोटो काढल्याचे बघून वाळूमाफियाने हवेत गोळीबार करुनन दहशत पसरवण्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता चांदसर ता. धरणगाव येथे घडली. या घटनेप्रकरणी एकुण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश ईश्वर कोळी, आबा ईश्वर कोळी, गणेश सोमा कोळी, मोहन गोविंदा कोळी, कल्पेश महेश पाटील, राहुल भीमराव कोळी, राहुल दिलीप, कोळी (सर्व रा. चांदसर, ता. धरणगाव) तसेच गोपाल कोळी, दीपक कोळी (दोन्ही रा. वाकटुकी, ता. धरणगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कोतवाल अमोल मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांदसर गावातील नदीपात्रातून वाळू उपसा सुरु होता. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गावाबाहेर चाऱ्या खोदून रस्ता बंद करण्यात आला होता. तरी देखील अवैध वाळू उपसा सुरु ठेवण्यासाठी वाक टुकी येथील काहीजण चाऱ्या बुजवत होते. हा प्रकार कोतवाल अमोल गुलाब मालचे यांना समजल्यानंतर  त्यांनी घटनास्थळी जाऊन संबंधितांना याबाबत जाब विचारला. त्यावर वाळू माफियांनी शिवीगाळ करत मालचे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. गोपाल कोळी याने त्याच्याजवळ असलेल्या पिस्तूलने हवेत गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ माजली.

या घटनेची माहिती समजताच पाळधी पोलिसांचे पथक गावात पोहोचले. दरम्यान संशयित फरार झाले. धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयितांच्या मागावर पोलिस पथक रवाना झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here